जळगावात पाणीपुरवठा एक  दिवस उशीराने; मुख्य जलवाहिनीला मेहरूणमध्ये लागली गळती

जळगाव — वाघुर धरणावरून शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला मेहरुण गोसावी मळा जवळ मोठी गळती लागली आहे. पाणीपूरवठा विभागाकडून आज दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे शहराचा पाणीपुरवठा एक  दिवस पुढे ढकलण्यात आला असल्याची माहिती मनपा पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.हि जलवाहिनी १२०० मीमी व्यासाची असून गिरणा टाकीला जोडली जाणारी मुख्य जलवाहिनी आहे. जलवाहिनी फुटल्याची माहिती मनपाला मिळताच त्वरीत पाणीपूरवठा विभागाने जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेतले. शहरात होणारा पाणीपुरवठा एक  दिवस  पुढे ढकलण्यात आलेला असल्याची माहिती जळगाव महापालिकेचे पाणी पुरवठा अधिकारी यांनी कळविली आहे .

बुधवार ६ जानेवारी रोजीचा पाणीपुरवठा-
नटराज टाकी ते चौघुले मळा, शनीपेठ, बळीरामपेठ, शनीपेठ, नवीपेठ, हौसिंग सोसायटी, प्रतापनगर, गेंदालाल मिल, खडके चाळ, इंद्रप्रस्थ नगर, के. सी. पार्क, गेंदालाल मिल हुडको, रिंगरोड, भोईटे नगर, भिकमचंद जैन नगर, आकाशवाणी, जुनेगाव, सिंधी कॉलनी, इंडिया गॅरेज, ओंकारनगर, जोशीपेठ, हेमुकलाणी टाकीवरील परिसर, गणेशवाडी, कासमवाडी, सम्राट कॉलनी, ईश्‍वर कॉलनी, वर्षा कॉलनी, सुप्रिम कॉलनी, डी. एस. पी. टाकीवरील तांबापुरा, गणपती नगर, आदर्श नगर, प्रभात कॉलनी, ब्रुकबॉण्ड कॉलनी या भागात पाणीपुरवठा होणार आहे.

गुरुवार ७ जानेवारी रोजीचा पाणीपुरवठा-
वाल्मिकनगर, कांचननगर, दिनकर नगर, असोदा रोड, रामेश्‍वर कॉलनी व परिसर, मोहननगर, नेहरूनगर, हरिविठ्ठल नगर, पिंप्राळा गावठाण परिसर, दांडेकर नगर, मानराजपार्क, असावा नगर, निसर्ग कॉलनी, द्रौपदी नगर, मुक्ताईनगर, धनश्रीनगर, पोलिस कॉलनी, खोटेनगर, गेंदालाल मिल, शिवाजीनगर हुडको, प्रजापत नगर, एस.एम.आयटी परिसर, योगेश्‍वर नगर, हिरापाईप, शंकरराव नगर, खेडीगाव परिसर, तांबापुरा, शामाफायर, वाघनगर, हरिविठ्ठल नगर, शिवकॉलनी, विद्युत कॉलनी, राका पार्क, पोस्टल कॉलनी, विवेकानंद नगर, जिल्हारोड, रामदास कॉलनी, शारदा कॉलनी, महाबळ कॉलनी, ऑफिसर क्‍लब.या प्रमाणे पाणी पुरवठा करून जळगाव शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येणार आहे.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close