
रिध्दी जान्हवी फाऊंडेशन तर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन
जळगाव — आज प्रथम महिला शिक्षिका,समाज सुधारिका व कवियत्री क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त दाणा बाजार परिसरातील दत्त मंदिराजवळ जळगाव येथील रिध्दी जान्हवी फाऊंडेशन तर्फे फाऊंडेशन च्या संस्थापक अध्यक्षा सौ.चित्रा मालपाणी ह्यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मिठाई वाटप करण्यात आली. कार्यक्रमाला रिध्दी जान्हवी फाऊंडेशनचे श्री.चंदन पाटील, श्री. किरण कोलते,श्री सतीश दायमा,सौ. पद्मावती राणा,सौ. कीर्ती
राणा,सौ. निशा पाटील, सौ. संगीता दायमा, इत्यादी सभासद उपस्थित होते. कार्यक्रमाची रूपरेषा कीर्ती राणा यांनी तर आभार चंदन पाटील यांनी केले.
Live Cricket
Live Share Market