
रस्त्यावर रहदारीस अडथळा निर्माण होईल अशा प्रकारे रिक्षा थाबविणारे रिक्षा चालक यांचेवर कारवाई
धुळे, अब्दुल रहमान मलिक यांची रिपोर्ट
धुळे –अधीक्षक धुळे यांचे आदेशाअन्वये धुळे शहरात हम रस्त्यावर रहदारीस अडथळा निर्माण होईल अशा प्रकारे रिक्षा थाबविणारे रिक्षा चालक यांचेवर कारवाई करण्याचे आदेशा झाल्याने अप्पर पोलीस अधीक्षक । धुळे यांचे मार्गदर्शनाने। प्रदीप पाडवी , उप विभागीय पोलीस अधिकारी धुळे शहर उप विभाग व शहर वाहतुक शाखा धुळे येथील पोनि / वाय.जी.गायकवाड , सपोनि / एस.आर.राऊत पोसई / डी.आर.माळी . व असई / परदेशी , गोरे , पोहेकॉ / दत्तात्रे साळुखे , जितेंद्र आखाडे , हसन शाह , पोना / अरीफ शखे ,
दिनेश देवरे , पंकज माळी , मपोकॉ / दिपीका वाघमोडे तसेच पोलीस मुख्यालय धुळे येथील क्यु.आर.टी. पथकाने धुळे शहरात संतोषी माता चौक , कराची चौक , फुल वाला चौक , गोल चौकी , बस स्थानक , पो.मु.
गेट धुळे . बारापत्थर चौक जुना आग्रा रोड , पाचं कंदिल चौक या ठिकाणी रहदारीस अडथळा निर्माण करणारे तसचे स्टॉप नसतांना प्रवासी बसविणारे असे २५ ते ३० रिक्षा चालक याच्या रिक्षा शहर वाहतुक शाखा कार्यालय धुळे आवारात जमा करण्यात आलेल्या असुन वरिष्ठांच्या आदेशाअन्वये त्याची कागद पत्राची तपासणी करुन त्यांचेवर नियमा प्रमाणे कारवाई करण्याची दक्षता ठेवण्यात आलेली आहे .
तसेच रहदारीस अडथळा निर्माण करणारे दोन चाकी व चार चाकी व ईतर रिक्षा , काली पिली या वाहनांवर देखील कारवाई करण्यात येणार आहेत . तसेच जुना आग्रा रोड वरील रहदारीस अडथळा निर्माण होईल अशा प्रकारे जे हॉर्कस धारक भाजीपाला व ईतर साहित्य विक्री करतात त्याचेवर देखील महानगर पालीका अतिक्रमण पथक सामिल करुन त्योवरही त्वरीत कार्यवाहिक करण्याची मोहिम ३० जानेवारी
२०२१ पावेतो राबविण्यात येणार आहे .अशी माहिती पोलीस निरीक्षक वाय.जी.गायकवाड यांनी दिली .