गुरांचे वाहन अडवून चालकाकडे खंडणीची मागणी ,तिघांवर पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

धुळे,अब्दुल रहमान मलिक 

धुळे – गुरांची वाहतूक करणारे वाहन अडवून गोरक्षक संघटनेचे पदाधिकारी असल्याचे सांगत वाहनचालकाकडे खंडणीची मागणी करणाऱ्या तिघांवर पश्चिम देवपूर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे . याबाबत सहचालक जुबरअली याकुबअली ( वय ३२ रा . भवरासा , सोनकच्छ , जि . देवास , मध्यप्रदेश ) याने पोलिसात फिर्यादी दिली आहे .फिर्यादित म्हटले आहे की ३ जानेवारी रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास नगाव शिवारात धमाणे फाट्यावर अक्षय किशोर चौधरी , संजय शर्मा व कुणाल उर्फ गुड्डया वाल्मीक बोरसे ( रा . मोगलाई ) यांनी त्याचे वाहन अडविले . आम्ही गोरक्षक संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते आहोत , तू गुरांची वाहतूक करतो , आम्ही तुझ्याविरुद्ध गुन्हा दाखल करू , अशी भीती घालून शिवीगाळ करत दमदाटी केली . तसेच जिवे मारण्याची धमकी देवून ५० हजार रूपये खंडणीची मागणी केली . त्यावरून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . तपास पोहेकाँ शेख करीत आहेत .

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close