
महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये चाळीसगाव रोड परिसरात मोठ्या प्रमाणात पाण्याची पाईपलाईन लिकेज मुळे परिसरात दूषित पाणीपुरवठा
धुळे, अब्दुल रहमान मलिक यांची रिपोर्ट
धुळे –महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये चाळीसगाव रोड परिसरात मोठ्या प्रमाणात पाण्याची पाईपलाईन लिकेज.गेल्या कित्येक दिवसापासून चाळीसगाव रोड विविध ठिकाणी पाईप लाईन लिकीज हे लिखित झालेली आहे. त्यामुळे परिसरात दूषित पाणीपुरवठा होतो आणि नागरिकांना रोगराईच्या सामोरे जावे लागते .यासंदर्भात लोकप्रतिनिधींनी आणि नागरिकांनी महानगरपालिकेला वेळोवेळी तक्रार देऊन सुद्धा हे पाईप लाईन लिकेजचे काम होत
नाही.महानगरपालिका या पाईपलाईन लिकेज कडे दुर्लक्ष करत असल्यामुळे आता याचा त्रास स्त्यावरून ये-जा करणार्या नागरिकांना होत आहे .परिसरात मोठा खड्डा पडला आहे कुठे मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे चाळीसगाव रोड वर शारदा शाळेच्या समोर जवळजवळ सहा महिन्यापासून मोठा लिकीज
झाला आहे तक्रार करून सुद्धा नगरपालिका याच्याकडे दुर्लक्ष करत आहे. शंभर फुटी रस्त्यावर देखील याच प्रमाणे जवळजवळ सहा ते सात महिन्यापासून मोठा लिकीज झालेला आहे
.त्याच्यामधून रोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे यामुळे महानगरपालिकेने याकडे लक्ष देण्याची गरज आहे .अशी मागणी परिसरातील नागरिक आणि
नगरसेवक अमीन पटेल यांनी केली आहे.