
हमरस्त्यावर काही रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या हॉकर्सधारकांवर कार्यवाही
धुळे, अब्दुल रहमान मलिक यांची रिपोर्ट
धुळे शहरात जुना आग्रारोड शिवाजी पुतळा ते पोवतो शहराची मुख्य बाजारपेठ असुन त्याठिकाणी वाहतुकीची मोठी वर्दळ सुरु असते . सदर हमरस्त्यावर काही हॉकर्सधारक रहदारीस अडथळा निर्माण हाईल अशा प्रमारे आपले हॉकर्स उभे करुन भाजीपाला , फळे , कटलरी वस्तु , लहान मुलांचे कपडे इत्यादी
प्रकारचे साहित्य विक्री करीत असतात त्यांना वेळोवेळी सुचना देवुनही ते हमरस्त्यावर रहदारीस अडथळा निर्माण होईल अशा प्रकारे आपले हॉकर्स उभे करुन भाजीपाला व इतर जिवन आवश्यक वस्तुची विक्री करतात त्यांना आळा बसण्यासाठी मा . पोलीस अधिक्षक सो धुळे यांचे सुचने प्रमाणे जुना
आगारोडवरील बॉम्बे लॉज कॉर्नर ते कराची चौक याभागातील रहदारीस अडथळा करणारे १२ ते १४ हॉकर्स धारक यांना शहर वाहतुक शाखा कार्यालय धुळे
येथील पो.नि.युवराज गायकवाड पोहेकॉ / ज्ञानेश्वर पाटील पोना / आरीफ शेख , राहुल पाटील , ज्ञानेश्वर साळुखे , जितद्र पाटील , दत्तात्राय साळुखे , किरण मेहरुणकर , रशिद मन्सुरी , मनोहर महाले , जितेंद्र
आखाडे , चंद्रशेखर कुलकर्णी , प्रसन्न पाटील , दिपीका वाघमोडे , तसेच पोलीस मुख्यालय येथील क्युआरटी पथक यांनी कामगिरी केली आहे .