ग्रामपंचायत विजयी उमेदवार व पँनल प्रमुखांनी आज मिरवणूक काढु नये — सपोनि माधव पुरी..!

 

आकाश ठाकूर–/

 

ग्रामपंचायत विजयी उमेदवार व पँनल प्रमुखांनी आज मिरवणूक काढु नये — सपोनि माधव पुरी

 

रामतीर्थ पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व ग्रामपंचायत निवडणुकितील पॅनल प्रमुख, उमेदवार यांना सूचना आहे…!

 

सध्या चालू असलेल्या कोरोना (19) च्या संसर्गजन्य आजाराच्या पाश्वभुमीवर आज ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणी असून विजयी उमेदवार यांनी कुठल्याही प्रकारची मिरवणूक काढु नये सध्या नांदेड जिल्ह्यात कलम 37(1)(3) महाराष्ट्र पोलीस अधिनियमचा अमल चालू असुन त्यानुसार आपल्या गावात डि.जे. किंवा साउंड बॉक्स /बँन्ड लावून मिरवणूक काढणे, उगाच पराभूत उमेदवार यांच्या गल्लीत व घरासमोर जाऊन फटाके वाजवणे,गुलाल उधळणे असे वर्तन करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहे. आणि जो कोणी असे प्रकार करील व त्यावरून दोन गटात भांडणे होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी उमेदवार व पॅनल प्रमुख यांची ठरवुन त्यांचेवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्यासाठी सर्व उमेदवार व पॅनल प्रमुख यांना अगोदरच कलम ( १४९ ) फौजदारी प्रक्रिया संहिता प्रमाणे नोटीस देण्यात आल्या आहेत.

तसेच पराभूत उमेदवार यांनी देखील मोठ्या मनाने पराभव स्विकारुन कोणत्याही प्रकारचा खोडकर पणा न करता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी.

त्यांनी विजयी उमेदवार यांचे स्वागत करून गावच्या विकासात मदत करावी. निवडणुकीमध्ये विजय आणि पराभव होत असते. त्यामुळे त्याचा सर्वांनी आनंदाने स्विकार करावा. व गावातील सर्वसामान्य नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही याची पॅनल प्रमुख/विजयी उमेदवार/पराभूत उमेदवार यांनी दक्षता घ्यावी असे

आवाहन  रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माधव पुरी यांनी केले आहे….

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close