धुळे प्रांताधिकाऱ्यांच्या घरात चोरी

अब्दुल रहमान मलिक यांची रिपोर्ट

धुळे —- गेल्या काही दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात चोरीच्या घटना वाढल्या असून पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास थंडपणे होत असल्याने चोरट्यांचे मनोधैर्य उंचावले आहे . अलीकडे तर शासकीय अधिकाऱ्यांची घरे देखील चोरट्यांच्या रडारवर आली असून काही महिन्यांपुर्वी थेट पोलीस निरिक्षकाच्या बंगल्यातच चोरट्यांनी हातसफाई केली होती . आज पहाटे देखील प्रांताधिकाऱ्यांच्या घरी चोरी झाल्याचे उघडकीस आले असून घर बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधली आहे . चोरी केल्यानंतर पळून जाण्यासाठी त्यांना याच घराच्या पाठीमागे असलेली बांबुची शिडी लाभदायी ठरली आहे . घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिका – यांनी तसेच श्वान पथकासह ठसे तज्ज्ञांनी घटनास्थळी हजेरी लावली असली तरी ज्यांच्या घरी चोरी झाली ते प्रांताधिकारी बाहेरगावी असल्याने ते धुळ्यात परतल्यानंतरच नेमका किती ऐवज चोरीस गेला ? याची माहिती मिळणार आहे .

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close