
अजिंठा चौफुली महामार्गावरील अतिक्रमणावर मनपाचा हतोडा; उपायुक्तांची धडक कारवाई
जळगाव, भावेश ढाके
जळगाव,शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या कामातील अडथळे सर्व संबंधित यंत्रणांनी तातडीने दूर करावे. जेणेकरुन महामार्गाचे काम गतीने पूर्ण करता येईल. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी १२ जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत केले होते.
या बैठकीत जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, जळगाव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम गतीने पूर्ण होण्यासाठी वीज वितरण कंपनीने रस्त्यावरील जुन्या लाईन व पोल तातडीने काढून घ्यावेत. त्याचबरोबर महानगरपालिकेने महामार्गावरील अतिक्रमण तातडीने हटवावे. अजिंठा चौफुलीपासून पुढे रस्त्यावरच ट्रक दुरुस्तीचे काम केले जाते, महामार्गाच्या दोन्ही बाजूस विक्रेते दुकान मांडून वस्तुंची विक्री करतात त्यामुळेही वाहतुक कोंडी होवून रस्ताच्या कामात अडथळे येतात. याबाबत पोलीस, परिवहन व महापालिकेने संयुक्त कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले होते.
याच अनुषंगाने आज अतिक्रमण निर्मुलन विभागाचे प्रमुख व मनपाचे उपायुक्त संतोष वाहुळे यांनी अजिंठा चौफुली महामार्गावरील अतिक्रमणे आज मनपाने मोठी कारवाई करत अतिक्रमण हटवले.
या कारवाई वेळी मनपा उपायुक्त संतोष वाहुळे व मनपा अतिक्रमण विभागाचे संजय राठोड, किशोर सोनवणे व कर्मचारी आदि उपस्थित होते.