राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी जळगांव जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फ वरिष्ठ क्रिकेट खेळाडूंसाठी जिल्हा संघ निवड चाचणी

जळगाव –महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने होणार्‍या राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी, जळगांव जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे *वरिष्ठ म्हणजे खुल्या गटासाठी ही निवड चाचणी शनिवार दिनांक २३ जानेवारी २०२१ रोजी घेतली जाईल*
निवड चाचणी अनुभूती आंतरराष्ट्रीय शाळा, शिरसोली मार्ग जळगाव येथे घेण्यात येईल

इच्छुक खेळाडूंनी आपली नावे त्वरित ९४२२२७८९३६ या व्हॉटअप क्रमांकावर दिनांक २२ जानेवारी २०२१ रोजी सायंकाळी ५ पर्यन्त नोंदवावीत

नोंदणी केलेल्या खेळाडूंनी निवड चाचणी दिवशी सकाळी ८.३० वाजता क्रिकेटच्या पांढऱ्या पोशाखात स्वतःच्या क्रिकेट साहित्यासह तसेच आधार कार्ड व निवड चाचणी शुल्क ₹ १००/- घेऊन उपस्थित रहावे.

निवड झालेल्या खेळाडूंना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय आमंत्रितांच्या स्पर्धेत जळगांव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close