
पुणे – सीरम इन्स्टिट्यूटला आग,आज मुख्यमंत्री भेट देणार
पुणे — कोरोना लस निर्मितीमुळे जगाचे लक्ष वेधून घेणाऱ्या हडपसरजवळील सीरम इन्स्टिट्युटच्या मांजरी येथील प्लांटमध्ये गुरूवारी दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. सीरम इन्स्टिट्युटमधील “आर-बीसीजी’ लस निर्मितीकरणाऱ्या इमारतीमध्ये ही आग लागली असून कोरोनाच्या “कोवीशील्ड’ लस निर्मिती केंद्र त्यापासून दूर आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज इन्स्टिट्यूटला भेट देऊन माहिती घेतील.
Live Cricket
Live Share Market