शिवसेना व युवा शक्ती फाऊंडेशन जळगावतर्फे शासकीय योजना शिबीर

जळगाव, भावेश ढाके

जळगाव शहरातील पांडे डेअरी चौकातील राधाकृष्ण मंगल कार्यालयाजवळ शिवसेना महानगर आणि युवा शक्ती फाऊंडेशन तर्फे शासकीय योजना शिबीराचे उद्घाटन शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांच्याहस्ते आज सकाळी करण्यात आले.

नागरीकांची अडचण दुर करण्यासाठी युवाशक्ती फाऊंडेशनचे अध्यक्ष विराज कावडीया यांनी पुढाकार घेवून शिवसेना महानगर यांच्या सहकार्याने आज या शिबीराचे आयोजन केलेलं आहे. हे शिबीर २१ जानेवारी ते ३१ जानेवारी पर्यंत सुरू राहणार असून, शिबीरात अल्पदरात जनधन आरोग्य योजना, पॅनकार्ड, मतदान कार्ड, स्मार्ट कार्ड, महात्मा फुले जनआरोग्य योजना, ज्येष्ठ नागरीक कार्ड, श्रावणबाळ पेन्शन योजना, संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी योजना यासह आदी योजना नागरीकांसाठी अल्पदारात उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close