
आटो कन्सल्टिंग च्या दुकानाला भीषण आग लागल्याने आगीत लाखोंचे नुकसान
धुळे, अब्दुल रहमान मलिक यांची रिपोर्ट
धुळे —- शहरातील 80 फुटी रोडवरील असलेल्या सबा आटो कन्सल्टिंग येथे अचानक आग लागल्याने लाखोचे नुकसान झाले असून सुदैवाने यात मात्र कुठलीही जीवित हानी झाली नाही. या आगीत दुकानात असलेले दुचाकी जळून खाक झाल्या असून त्यात दुकान मालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
आग लागलेल्या सबा आटो कन्सल्टिंग शेजारील असलेले नेहाल टायर दुकान व बाजूला असलेले एका घराचेही आगी मुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिसरातील नागरिकांनी धुळे महानगरपालिका येथे फोन केले असता किमान सव्वा ते दीड तासानंतर
अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले. आणि विशेष बाब म्हणजे अग्निशामक बंब चा पाईप लिकिज असल्यामुळे पाणी उशिरा पोचल्याने आगीने रौद्ररूप धारण केले होते. त्या मुळे परिसरातील नागरिक व सामाजिक कार्यकर्ता यांच्या प्रयत्नाने आग आटोक्यात
आणण्यात आली व पुन्हा एकदा धुळे मनपाचे ढिसाळ कारभारामुळे नागरिकांनी धुळे मनपा अधिकाऱ्यांवर तसेच आयुक्त अजीज शेख यांच्यावर रोष वेक्त केला.