तोरणमाळ येथील खडकी रस्त्यावर मजुरांना घेऊन जाणाऱ्या जीपचा अपघात,6 ठार,10 जखमी

अब्दुल रहमान मलिक यांची रिपोर्ट

नंदुरबार,  —धडगाव तालुक्यातील अतिदुर्गम भागातील तोरणमाळ येथील खडकी रस्त्यावर मजुरांना घेऊन जाणाऱ्या जीपचा अपघात झाला आहे. अपघातात सहा जणांचा मृत्यू याची प्राथमिक माहिती आहे तर आतापर्यंत दहा जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. मजुरांना घेऊन जाणाऱ्या जीप चालकाचा घाट रस्त्यावर ताबा सुटल्याने जीप चारशे मीटर खोल दरीत कोसळल्याने वाहनांचा देखील मोठे नुकसान झाले असून गाडी 25 पेक्षा अधिक मजूर असल्याचे माहिती देखील समोर येत आहे. अपघातात आतापर्यंत सहाजण दगावले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर गंभीर जखमींना तोरणमाळ ग्रामीण रुग्णालय व म्हसावद ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर अतिगंभीर जखमींना नंदुरबार जिल्हा ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. अपघातानंतर तात्काळ स्थानिक नागरिकांनी मदत कार्य सुरू केले होते. तोरणमाळ वन विभागाचे कर्मचारी आणि म्हसावद पोलीस कर्मचारीदेखील घटनास्थळी दाखल झाले आहे.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close