
पेट्रोल दर वाढीचा फटका सर्वसामान्यांना,पेट्रोल शंभरी च्या जवळपास जाऊन पोहोचले आहे
धुळे,
अब्दुल रहमान मलिक यांची रिपोर्ट
धुळे -–सध्या राज्यामध्ये इंधन दरवाढ मध्ये प्रचंड वाढ होत असून आठवडा भरामध्ये चौथ्यांदा इंधनाच्या दरांमध्ये वाढ झाल्यास बघावयास मिळत आहे. धुळ्यात देखील या इंधन दरवाढीचा फटका धुळेकरांना बसताना दिसत आहे.
आधीच लॉक डाऊन मुळे मेटाकुटीस आलेल्या नागरिकांना हातचा रोजगार गेल्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. परंतु राज्याची अर्थव्यवस्था जेमतेम रुळावर येत असताना त्यातच इंधन दरवाढीचा सर्वसामान्य वाहनधारकांना चांगलाच फटका बसताना दिसत आहे.आठवडाभर मध्ये सलग
चौथ्यांदा पेट्रोल व डिझेल मध्ये वाढ झाल्यानंतर आता पेट्रोल शंभरी च्या जवळपास जाऊन पोहचले आहे.सध्या धुळ्यात पेट्रोल 92.60 पैसे असून डिझेल
81.81 इतके आहे.अशीच दरवाढ पुढील काळात देखील सुरूच राहिली तर काही दिवसांमध्ये पेट्रोल लिटर मागे शंभरी गाठल्या शिवाय राहणार नाहीये.