
जळगाव जिल्हा पोलीस दला तर्फे गणतंत्र दिवस निमित्त रक्तदान शिबीर
जळगाव,भावेश ढाके
जळगाव — ७२ व्या गणतंत्र दिवस निमित्ताने समस्त जळगाव जिल्हा पोलीस दल आणि रेडप्लस ब्लड बँक यांच्या विद्यमाने महारक्तदान शिबीर आज २६ जानेवारी रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या परिसरातील मंगलम हॉल येथे आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.गुलाबराव पाटील तर उद्घाटक जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक प्रविण मुंढे हे होते. या प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, रेडप्लस ब्लड बँकेचे चेअरमन डॉ. मोईज देशपांडे, डॉ. मिनाज पटेल, भरत गायकवाड, अक्तरअली सय्यद, आदी मान्यवर उपस्थित होते.
Live Cricket
Live Share Market