
अर्धवट बिडीच्या थोटका वरून पोलिसांनी लावला दरोडा टाकणाऱ्या टोळीचा छडा
धुळे
, अब्दुल रहमान मलिक यांची रिपोर्ट
धुळे –जिल्ह्यामध्ये थैमान घालणाऱ्या घरफोडी टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे
अर्धवट जळालेल्या बिडीच्या थोटका वरून पोलिसांनीतपासाची चक्रे फिरवली आणि चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या चोरट्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली देखील दिली आहे.
धुळे जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये धाडशी घरफोड्यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने पोलिस प्रशासनाच्या डोकेदुखी मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती.साक्री तालुक्यातील पिंपळनेर सामोडे याठिकाणी एका घरामध्ये पहाटेच्या दरम्यान या चोरट्यांनी बंदुकीचा धाक दाखवत घरातील सोने-चांदी त्याचबरोबर रोख रक्कम असा आठ लाख 87 हजारांचा मुद्देमाल चोरून पोबारा केला होता. तसेच शिंदखेडा तालुक्यातील
एका कंपनीमध्ये देखील तब्बल 66 इलेक्ट्रॉनिक मोटारी या चोरट्यांनी चोरल्या होत्या.शिंदखेडा पोलीस ठाण्यामध्ये तसेच पिंपळनेर पोलिस ठाण्यामध्ये या दोनही चोरीची नोंद करण्यात आली होती.
पोलिस प्रशासनाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने आपली तपासाची चक्र फिरवली असता या दोनही चोरीमध्ये पोलिसांना अर्धवट जळालेली बिडीची थोटकं आढळून आलीत
या अर्धवट जळालेल्या बिडीच्या थोटकांवरून पोलिसांनी एकाच टोळीने या दोन्ही चोर्या केल्या असल्याचा अंदाज बांधला व त्या अनुषंगाने आपली तपासाची चक्रे फिरवलीपोलिसांना तपासा दरम्यान घरफोड्या करणारी टोळी मध्यप्रदेश मधील असल्याचे समजले
लाल्या उर्फ रवी देविलाल फुलेरी या चोरट्याने आपल्या काही साथीदारांच्या मदतीने केली असल्याचे स्पष्ट झाले.
त्यानंतर धुळे शहरातील शंभर फुटी रोड परिसरामध्ये लाल्या लपलेला असल्याचे देखील पोलिसांना आपल्या गुप्त माहिती दाराकडून समजल्यानंतर पोलिसांनी अखेर या टोळीतील दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
या दोघांनी धुळे जिल्ह्यात पिंपळनेर सामोडे येथे बंदुकीचा धाक दाखवून घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. त्याचबरोबर शिंदखेडा येथील कंपनीमध्ये देखील 66 मोटारी चोरल्याचे पोलिसांना कबूल केले आहे.या दोघा चोरट्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची सखोल चौकशी पोलीस करीत आहेत.परंतु एका बिडीच्या थोटका वरून घरफोडी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी पर्दाफाश केल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या तपास अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.