
समृध्दी हर्षल संत यांची अबोली पाटिल यांनी घेतलेली मुलाखत
जळगाव —
अबोली पाटिल
जळगाव — नवी दिल्ली येथे 26 जानेवारी 2021 रोजी 72 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त झालेल्या रिपब्लीक डे परेड मध्ये भारतीय नॅशनल कॅडेट कॉर्पस् (एन.सी.सी.) गर्ल्स कन्टीजन्ट चे नेतृत्व करण्याचा मान जळगाव ची भूमिपुत्री सिनियर अंडर ऑफिसर
*समृद्धी हर्षल संत* हीला प्राप्त झाला. स्वतंत्र भारताच्या इतिहासात हा मान मिळवणारी समृध्दी ही महाराष्ट्रातील पहिली मुलगी ठरली . देशभरातून 125 एन.सी.सी. कॅडेटस सदर परेडसाठी निवडण्यात आले
होते. यामधून समृद्धी संत हिची प्लाटून कमांडर म्हणून निवड करण्यात आली. ही आपल्या जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे . यासाठी SUO समृध्दी हर्षल संत या जळगावच्या लेकीच कौतुक करण्यासाठी *भारतीय जनता पार्टी चित्रपट कामगार आघाडी जळगाव जिल्हा अध्यक्ष भुषण भोळे व,महिला जिल्हा सरचिटणीस अबोली पाटील व सर्व जळगाव जिल्हा व महानगर पदाधिकारी यांनी तिची भेट घेऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या . तसेच आपल्या जिल्ह्याच नाव संपूर्ण देशात लोकिक केलं यासाठी तीला धन्यवाद म्हणत भविष्यात काहीही मदत लागल्यास आम्ही तुझ्या पाठीशी खंबीर पणे उभे राहू अशी ग्वाही दिली. यावेळी जळगावची शान SUO समृध्दी संत चा सत्कार करतांना भाजपा चित्रपट कामगार आघाडी जळगाव जिल्हा अध्यक्ष भुषण भोळे, महिला जिल्हा
सरचिटणीस अबोली पाटील सोबत जिल्हा सरचिटणीस तेजस भंगाळे, महानगर अध्यक्ष सागर खुंटे, महिला महानगर अध्यक्ष मृणाली देवरे, महानगर उपाध्यक्ष गौरव पाटील व तिचे वडील हर्षल काका संत आई ,आजोबा चंद्रकांत संत उपस्थित होते