
इक्बाल मिर्ची प्रकरणात या नेत्याला ईडीकडून समन्स
!मुंबई — राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना पुन्हा एकदा ईडीकडून समन्स बजावला जाणार आहे. यापूर्वी सुद्धा प्रफुल पटेल यांना समन्स पाठवण्यात आला होता, मात्र तेव्हा ते ईडी कार्यालयात गेले नव्हते. यामुळे त्यांना पुन्हा समन्स पाठवला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.
ड्रग्स माफिया इक्बाल मिर्चीचं आयएसआशी कनेक्शन असल्याचं ईडीच्या तपासात उघड झालं आहे. या प्रकरणात ईडीने नुकतंच एक आरोपपत्रं दाखल केलं होतं.मिर्चीची बायको आणि मुले जुनेद आणि आसिफ यांच्यासह आणखी काही जणांवर हे आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं.
Live Cricket
Live Share Market