शिवजयंती निमित्त महारक्तदान शिबीराचे आयोजन…..! महेश रोडगे पाटील….

 

आकाश ठाकूर—/

शिवजयंती निमित्त महारक्तदान शिबीराचे आयोजन…..! महेश रोडगे पाटील….

 

 

दि. १७ फेब्रुवारी २०२१ बुधवार रोजी औरंगाबाद नारळीबाग या भागात महेश रोडगे मित्र परिवार (V.M.GROUP) यांच्या वतीने संकल्प
महारक्तदान शिबीराचे आयोजन…..!

 

 

पावन गणेश मंदिर, नारळीबाग, खडकेश्वर परिसरात करण्यात आले होते या रक्तदान शिबीरास प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला यावेळी शहरातील १३१ युवा रक्तदात्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला व सन्मानजनक आकडा गाठुन दिला सर्व मित्र परिवाराने अथक परिश्रम घेऊन हा अभिनव उपक्रम यशस्वी केला.
विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या रक्तदान शिबीरास भेट दिली यामुळेच उपक्रमाला सार्वजनिक स्वरुप प्राप्त झाले…

 

 

सध्याची गंभीर परिस्थिती लक्षात घेता महेश रोडगे मित्र परिवाराने स्वत:हून पुढाकार घेवून रक्तदान या कार्यक्रमाचे आयोजन केले.त्यांनी दाखविलेल्या या सामाजिक बांधिलकीमुळे रक्तपेढीमधील वैद्यकीय तज्ज्ञ, तसेच कर्मचारीही भारावून गेले.

 

रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असल्यामुळे शिवजयंती निमित्ताने रक्तदान शिबिरांचे आयोजन केले. मात्र, सध्या करोना संसर्गाचा धोका निर्माण झाला असल्यामुळे रक्तदानाच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी या भावनेने रक्तदान केल्याचे महेश रोडगे पाटील यांनी एक्सप्रेस १ न्यूज़ ने घेतलेली मुलाखत मधे सांगितले….

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close