जळगावात विनामास्क वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई

जळगाव प्रतिनिधी, 

भावेश ढाके

जळगाव — जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जळगाव शहरातील मुख्य बाजारपेठ असलेला टॉवर चौकात विना मास्क वाहनधारकांवर महापालिका आणि शहर पोलीस यांनी संयुक्त कारवाई करत प्रत्येकी ५०० रूपये दंडात्मक कारवाई करण्यात आली. यावेळी काही नागरीकांनी मनपा कर्मचार्यांशी आणि उपायुक्त संतोष वाहुळे यांच्याशी हुज्जत घातल्याचे दिसून आले.

जळगाव जिल्ह्यात दिवसें-दिवस कोरोना रूग्ण संख्येत वाढ होत असून, ही बाबत चिंताजनक असल्याने, जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनचे नियमात बदल करण्यात आले आहे.  या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास शास्त्री टॉवर चौकात महापालिकेचे उपायुक्त संतोष वाहुळे आणि शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय येरूळे यांच्या पथकाने मास्कच्या सक्तीसाठी रस्त्यावर उतरून दंड ठोठावला आहे. यात शासनाने दिलेल्या नियमानुसार सोशल डिस्टन्स न राखने, मास्क न घालणे यांच्यावर प्रत्येकी ५०० रूपये दंड आकारण्यात आला आहे. आज सायंकाळी दंडात्मक कारवाई केली आहे. यावेळी  यावेळी नागरीकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन, मास्क घालणे आणि गर्दीचे ठिकाण टाळवे असे आवाहन महापालिका, जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेले आहे.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close