
“अपेक्षाभंग झाला तर, पुढचा लढा ठाण्यातच लढणार” – महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन
- मुंबई | महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनने अन्यायग्रस्त शिक्षकांसोबतीला घेऊन गुरुवारी श्री. एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यासमोर रात्री उशिरा पर्यंत त्यांना भेटण्यासाठी ठिय्या मांडला होता याच धर्तीवर काल एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे भेट दिली.
महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री मा. एकनाथ शिंदे यांनी या आठवड्यात होणाऱ्या कॅबिनेट बैठीकीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत अन्यायग्रस्त मराठी युवक व युवतींचा शिक्षकभरतीचा मुद्दा घेऊन लवकरात लवकर मार्गी लावतो असे काल आम्हाला आश्वासीत केले त्यामुळे आतापर्यंत मार्ग सापडत नसलेल्या २५२ शिक्षकांना एक आशेचा किरण मिळाला आहे.
खरं तर शिवसेना सत्तेत असताना फक्त प्राथमिक शिक्षण मराठी माध्यमातून झाले आहे म्हणून BMC ने २५२ मराठी शिक्षक उमेदवारांना महाराष्ट्रातच नोकरीपासून वंचित ठेवले ही बाब संपूर्ण महाराष्ट्र आणि मराठी माणूस यांच्यासाठी संतापजनक आहे. तरी महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन सर्व अन्यायग्रस्त उमेदवारांसह कॅबिनेटच्या बैठकी दिवशी उपस्थित राहून निर्णयाची वाट पाहणार असल्याची माहिती एका प्रसिध्दी पत्रकात दिली आहे.
निर्णय शिक्षक हिताचा झाला तर मंत्री मोहदयांचे आभार मानू, अन्यथा तिथूनच आमचा लढा सुरू करू, मग आमच्यावर काय गुन्हे नोंद करायचेत ते करा असेही या पत्रात म्हटले आहे.