जळगावात डी-मार्ट सील; मनपा उपायुक्तांनी केली कारवाई

जळगाव प्रतिनिधी (भावेश ढाके) कोविड-१९ विषयी प्रशासनाने जाहीर केलेल्या नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी जळगावातील डीमार्ट हा आज सायंकाळी मनपा प्रशासनाने सील केले आहे.

जळगाव जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जळगाव जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी आणि सार्वजनीक ठिकाणी व दुकानांमध्ये, मॉल, मध्ये गर्दी करू नये असे निर्देश दिले आहेत. कुठे नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आल्यास दंडासह गुन्हे दाखल करण्याचे निर्देश आहेत.

दरम्यान आज जळगावातील शिरसोली रोडवर असणार्‍या डीमार्टमध्ये गर्दी असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली. या अनुषंगाने महापालिका उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आज सायंकाळी डी-मार्टवर धडक देत अचानक कारवाई केली. या ठिकाणी कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळून आल्यामुळे संपूर्ण डी-मार्ट सील करण्यात आले आहे.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close